जिल्हा परिषद हायस्कूल धानोराची यशाची परंपरा कायम ; 90.24 टक्के  निकाल

105

The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १४ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर झालेल्या इयत्ता 10 वीच्या निकालात जिल्हा परिषद हायस्कूल, धानोरा यांनी पुन्हा एकदा यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी शाळेचा एकूण निकाल 90.24% लागला आहे.
या परीक्षेसाठी शाळेचे एकूण 82 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 7 विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, 29 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 38 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
या यशामध्ये कु. खुशी प्रदीप गावतुरे हिने 82.20% गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर कुमारी गीतांजली मोहन सोनवले हिने 80% गुण मिळवून द्वितीय स्थान तर कु. श्रुती मोहुर्ले हिने 79.64% गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. कु. दीक्षा सिडाम (79%), वैष्णवी पोवरे (78.60%), प्रीतम कन्नाके (78.40%) आणि गायत्री मुंडले (78.20%) हे विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
शाळेच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकवर्ग यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
शाळेचा सातत्याने उत्तम निकाल आणि गुणवंत विद्यार्थ्यांची कामगिरी ही धानोरा परिसरासाठी अभिमानास्पद बाब ठरत आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #sscresult #10thresult )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here