जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी खमनचेरू-अहेरी रोडच्या कामाची केली पाहणी

146

– वनविभागाने अडवीले होते त्या कामाला सुरुवात
The गडविश्व
अहेरी, २० जानेवारी : तालुक्यातील खमनचेरू-अहेरी रस्ता कमला कामाला वनविभागाने अडवीले होते मात्र जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार वन विभागाच्या कर्मचाऱ्याशी चर्चा करून या रस्ता कामातील अडचणी दूर केल्या असता सदर रस्ता कामाला पुन्हा एकदा सुरवात करण्यात आली असून या रस्ता कामाची पाहणी जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी नुकतीच केली.
अहेरी खमनचेरू हे तालुक्याला जोडणारा एकमेव मुख्य मार्ग आहे. हा रस्ता मंजूर झाला असतांना सदर रस्त्याचे काही भाग वनविभागाच्या अख्त्यांरीत येत असल्याने वनविभागाने या कामाला थांबविले होते अशी चर्चा अहेरी व खमनचेरू गावात सुरु होती. मात्र जो रस्ता मागील ५० वर्षांपासून असून अचानकपणे वन विभाच्या अखत्यारीतीत कसे काय आले ? असा प्रश्न जनता करीत होती. जेव्हा विकास काम होणार असते तेव्हा वनविभाग विकास रोकून धरतात हे मात्र समजण्या पलीकडचे आहे. जनता वेळोवेळी वन विभाला मदत करत असते मात्र वन विभाग मात्र जनेचे काम होऊ देत नव्हते परंतु DFO टोलिया यांच्याशी जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी चर्चा केल्यावर वन विभागाने कामास मंजुरी दिली असून आज पासून कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट देऊन रस्ता कामाची पाहणी केली.
यावेळी माजी जि. प.सदस्या कु.सुनीता कुसनाके, अहेरी नगर पंचायत चे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, खमनचेरु सरपंच शायलू मडावी, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी होते.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (Usain Bolt) (Trossard) (That ’90s Show) (Hockey World Cup 2023) (Man City vs Tottenham) (Ajay Kankadalwar)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here