गडचिरोली येथे जागतिक पर्यावरण दिन व आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा

254

The गडविश्व
गडचिरोली, दि.०५ : जागतिक पर्यावरण दिन व आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस निमित्याने ०५ जून रोजी सकाळी सेमाना उद्यान गडचिरोली येथे मिलिश दत्त शर्मा उपवनसंरक्षक गडचिरोली वनविभाग गडचिरोली तसेच धीरज ढेंबरे सहायक वनसंरक्षक रोहयो गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात व अरविंद पेंदाम वनपरिक्षेत्र अधिकारी गडचिरोली यांचे नेतृत्वात वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय गडचिरोली व सामाजिक वनीकरण गडचिरोली यांचे संयुक्त विद्धमाने सेमाना उद्यान व देवस्थान परिसरात, हरितक्षेत्र वाढवण्याकरिता वृक्ष लागवड करण्यात आले. यावेळी सेमाना जैवविविधता उद्यान व मंदिर परिसरातील प्लास्टिक निर्मूलन करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अमृत सरोवर बचाव धरतीवर लगतचे पाण्याचे स्रोत व विहीर स्वच्छ करण्यात आले. तसेच जैवविविधतेत मूळ प्रजातीना बाधक असलेले हानिकारक प्रजातींचे निर्मूलन करण्यात आले.
याप्रसंगी श्रीकांत नवघरे क्षेत्रसहायक गडचिरोली तसेच विदया उईके वनपाल व नीलकंठ वासेकर वनपाल सामाजिक वनीकरण गडचिरोली, विजय जनबंधू क्षेत्र सहाय्यक गुरवडा, सुनील पेंदोरकर क्षेत्र सहाय्यक सावेला, रवींद्र वासेकर क्षेत्र सहायक मारोडा तसेच वनपरिक्षेत्र कार्यालय प्रादेशिक गडचिरोली व सामाजिक वनीकरण गडचिरोली येथील सर्व कार्यालयीन कर्मचारी व वनमजूर इत्यादीच्या सहकाऱ्याने सदर उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #forestgadchiroli #envormentday)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here