कुनघाडा वनपरिक्षेत्रात जागतिक हत्ती दिन साजरा

81

– जनजागृती रॅलीतून दिला मानव-वन्यजीव सहअस्तित्वाचा संदेश
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : रानटी हत्तींच्या अधिवासाचे संरक्षण आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ओळखले जाणारे कुनघाडा वनपरिक्षेत्राने १२ ऑगस्ट २०२५ रोजी “जागतिक हत्ती दिन” उत्साहात साजरा केला.
सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) गडचिरोली वनविभागाचे प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व वनपरिक्षेत्र अधिकारी कु. मधुमती तावाडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
२८ जुलै ते ६ ऑगस्ट २०२५ या काळात कुनघाडा कार्यक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर होता. या दरम्यान मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी वनकर्मचारी व RRT चमूने दिवस-रात्र गस्त घालून परिस्थिती नियंत्रणात ठेवली आणि संघर्ष टाळण्यात यश मिळवले.
हत्ती दिनानिमित्त कुनघाडा कार्यक्षेत्रातील गावा-गावात जनजागृती रॅली काढण्यात आली. गावांच्या मुख्य चौकांत थांबून नागरिकांना सहअस्तित्वाचा संदेश देण्यात आला. गिलगावच्या सरपंच श्रीमती रेखा आलाम आणि माल्लेरमालचे सरपंच वसंत वासुदेव चलाख यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात केली.
कार्यक्रमाचे नियोजन एच. जी. झोडगे (क्षे.स. कुनघाडा), आर. पी. थाईत (क्षे.स. जोगना) आणि एस. एस. खोब्रागडे (क्षे.स. पावीमुरांडा) यांनी केले. या उपक्रमात स्थानिक सरपंच, सर्व क्षेत्रीय वनकर्मचारी व वनमजूर उत्साहाने सहभागी झाले.
#thegdv #gadchirolipolice #gadchirolinews #WorldElephantDay #ElephantConservation #WildlifeProtection #HumanWildlifeCoexistence #Gadchiroli #ForestDepartment #Kunghada #WildElephant #जनजागृती #हत्तीसंरक्षण #वनविभाग #गडचिरोली #जागतिकहत्तीदिन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here