– मत्स्यजोग येथील सरपंचाची हत्या करणाऱ्या आरोपीला पकडून न्याय देण्याची मागणी
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०४ : ग्रापंचायत मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा खुनाच्या आरोपींना पकडुन न्याय देण्यासाठी ग्रामपंचायत रांगी च्या वतीने ३१ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ पर्यंत काम बंद आंदोलन करण्यात आले. काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध करण्यात आले. जेने करुन पुन्हा संरपंचावर अशा पद्धतीने हल्ले होनार नाही.
या आंदोलनात ग्राम पंचायत रांगी येथील सरपंचा सौ. फलेश्र्वरी गेडाम, नुरज हलामी उपसरपंच, सौ.अर्चना मेश्राम सदस्या ग्रा. प. रांगी, एम.बी. बांबोळे ग्राम.प.अधिकारी, तसेच ग्राम पंचायत कर्मचारी यांनी घोषणा देत व काम बंद करून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आले. यावेळी गावकरी उपस्थित होते.
