मॅरेथॉनमधून महिलांनी घेतला गाव संघटनेत सहभाग

101

The गडविश्व
गडचिरोली, १५ मार्च : गावात दारूविक्री बंदी व्हावी, असलेली दारू बंदी टिकून राहावी व मजबूत व्हावी, संघटनेत गावातील महिला, पुरुष, युवक, युवतींनी जुळावे. तसेच दारू, तंबाखूच्या दुष्पारीनामाबाबत जागृत करण्याहेतू मुक्तिपथतर्फे ‘रन फॉर मुक्तिपथ मॅरेथॉन दौड स्पर्धा’ गावात आयोजित केल्या जात आहे. ‘दारू व तंबाखू पासून मुक्तीसाठी धावूया’ ही या स्पर्धेची मुख्य थीम आहे. याच अनुषंगाने नुकतेच धानोरा तालुक्यातील आदिवासी बहुल मासारगठ्ठा येथे हि दौड स्पर्धा पार पडली. या मनोरंजनात्मक व सहभागी पद्धतीच्या असलेल्या मॅरेथॉन दौड कार्यक्र्मामातून गावातील सक्रीय सदस्यांनी गावसंघटनेत सहभाग घेतला आहे.
स्पर्धेच्या माध्यमातून गावातील दारू व तंबाखू विक्री थांबविण्यासाठी गावातील सक्रीय युवक, महिला व पुरुष मोठ्या संख्येत एकत्र आलेले दिसून आले. स्पर्धेची सुरवात गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते दारूमुक्तीची मशाल पेटवून करण्यात आली. यावेळी एकूण २४ महिलांनी सहभाग दर्शविला होता. दरम्यान, बैठकीचे आयोजन करून नवीन सदस्य जोडून मुक्तिपथ संघटना पुनर्गठीत करण्यात आली. सोबतच अवैध दारूविक्री विरोधात लढा देणे व व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करणे या विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमासाठी शीतल टेकाम, सायत्राबाई हलामी, जिजा दुगा,शामलता दुगा, लता गोटा यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन मुक्तीपथचे राहुल महाकुलकार यांनी केले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (GPT-4) (Bihar Board 12th Result 2023) (Poco X5 5G) (Sameer Khakhar) ( Imran Khan) (Lawrence Bishnoi) (Adani Enterprises) ( Northern Lights) (Inter Milan)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here