महिला मानसिकदृष्ट्या सक्षम : डॉ.राजु किरमिरे

169

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ११ : महिला कुठल्याही प्रकारे मागासलेल्या नाहीत, दुबळ्या नाहीत या उलट स्त्रिया या पुरुषांपेक्षा मानसिकदृष्ट्या जास्त सबळ व सक्षम आहेत असे मत डॉ.राजु किरमिरे यांनी व्यक्त केले. ते श्री.जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अध्यक्ष पदावरून बोलत होते.
८ मार्च २०२४ रोजी जागतिक महिला दिन निरंतर प्रौढ शिक्षण, विस्तार विभाग आणि महिला अध्ययन केंद्र द्वारा साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. राजू किरमीरे हे अध्यक्षस्थानी होते. तर प्रा.डॉ. विणा जांबेवार, प्रा. ज्ञानेश बंसोड, प्रा डॉ.सचिन धवनकर, प्रा डॉ.प्रियंका पठाडे, प्रा. वटक प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम अध्यक्षाच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. राजू किरमीरे यांनी महिला कुठल्याही प्रकारे मागासलेल्या नाहीत किंवा दुबळ्या नाहीत या उलट स्त्रिया या पुरुषांपेक्षा मानसिकदृष्ट्या जास्त सबळ व सक्षम आहेत असे आपले पुरोगामी मत मांडून विद्यार्थ्याना विस्तृत असे मार्गदर्शन केले. तसेच इतर मान्यवरांनी स्त्रियांनी कसे जागरूक राहायचे, स्वतः वर विश्वास ठेवून कुठलेही आवाहन पेलण्याची, मानसिक गुलामगिरी नाकारायची तयारी दाखविली पाहिजे असे जागृतीपर मार्गदर्शन केले. तसेच प्राची बडोले या विद्यार्थिनीने पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांनी आपले वर्चस्व दाखविण्याची वेळ आलेली आहे असे सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गिताचंद्र भैसारे यांनी केले तर आभार प्रा. ज्ञानेश बंसोड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. वाघ, प्रा.नितेश पुण्याप्रेडीवार, मनोज नन्नावरे तसेच वरिष्ठ तथा कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सर्व प्रशासकीय कर्मचारी व महाविद्यालयीन सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here