वनविभागाच्या वतीने रांगी येथे वन्यजीव सप्ताह साजरा
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०५ : संपूर्ण राज्यात १ ते ७ ऑक्टोंबर या कालावधीत वन्यजीवन सप्ताह साजरा करण्यात येतो. याच सप्ताहानिमित्त वनपरिक्षेत्र उत्तर धानोरा कार्यालय अंतर्गत रांगी येथे वन्य प्राण्यांचे संवर्धन हेच पर्यावरणाचे संरक्षण हा नारा घेऊन रांगी वनपरिक्षेत्राच्या वतीने १ ते ७ ऑक्टोंबर वन्य जीवन व पर्यावरण जागृतीसाठी रांगी येथे ४ ऑक्टोबर रोजी फेरी काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून वन व वन्य जीवनाचे संरक्षण करणे, शिकारीवर आळा घालने, पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे, वृक्षतोडीला आळा घालने आदि संदेश रॅलीतून देण्यात आले.
रॅलीत क्षेत्र सहाय्यक एस.आर. रामगुंडेवार रांगी, फालेश्वरी प्रदीप गेडाम सरपंच ग्रामपंचायत रांगी, देवराव कुणघाडकर, डॉ. अलाम रांगी, अंजुम शेख मुख्याध्यापिका रांगी, जी. के. कोडाप वनरक्षक निमणवाडा, एम. एम. राऊत वनरक्षक नरचुली,नवघरे, ठुमराज कुकडकार, तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशिराम भुरसे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोहडे वनरक्षक निमगाव यांनी केले तर आभार जागी जिल्हा परिषद शाळा रांगी यांनी मानले. दरम्यान उप वनपरिक्षेत्र रांगी येथे वनजीव सप्ताह सुरुवात झाली असून १ ते ७ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे. यात रांगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा व शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा रांगी यांच्या सहकार्याने गावात प्रभात फेरी काढून वन जीवन रक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वन विभागाचे कर्मचारी शिक्षक व गावातील गावकरी सहभागी रॅलीत झाले होते. वन्य जीवन पर्यावरणाच्या संवर्धनात सर्वांनी हातभार लावून वनविभागाला सहकार्य करावे असे आवाहन रांगी येथील क्षेत्र सहाय्यक राम गुंडेवार यांनी केले आहे.
