आरमोरीतील कोंडवाड्याचा वाली कोण ? मोजतोय अखेरच्या घटका

702

– नगर परिषदेचे दुर्लक्ष
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, ८ जुलै : माणसाला शिक्षा द्यायची असेल तर त्याला तुरुंगात बंदीस्त केल्या जाते परंतु मोकाट जनावरांना बंदिस्त करायचे असेल तर कोंडवाड्यात केले जाते. तोच त्यांचा तुरुंगवास असतो.
बंदिस्ते केलेले जनावर असो की माणसे जबाबदारी ही संबंधित अधिकाऱ्याची असते. मात्र आरमोरी येथील कोंडवाडा हा अखेरची घटका मोजताना दिसून येत असून याकडे मात्र नगर परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष असतांना दिसून येत आहे त्यामुळे या कोंडवाड्याचा वाली कोण असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
आरमोरी नगरपरिषदेच्या अगदी कार्यालयाला लागून असलेल्या कोंडवाड्यात नेहमी पाचपेक्षा जास्त जनावर बंदिस्त असतात त्यात गाई, म्हशी, वासरे, डुकरे इत्यादी.
ज्या कोंडवाड्यात ही जनावरे, टाकली जातात त्या कोंढवाड्याची इतकी दयनीय अवस्था आहे की, अत्यंत जुना पडीत त्यावरील अक्षरशः छत कोसळलेला असून, जनावरांना चारा पाण्याची कोणती व्यवस्था नाही, एकदा जोराचा पाऊस आला तर तो कोंडवाडा कधीही कोसळून जनावरांच्या जीवाला धोका होऊ शकतो एवढी दयनीय अवस्था आरमोरी नगर परिषदेतील स्थानिक बाजार चौकातील कोंडवाड्याची आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. कदाचित कोंढवाडा ढासळून बंदिस्त असलेल्या जनावरांची जीवित हानी झाली तर याला जबाबदार कोण ? असाही प्रश्न जनतेसमोर निर्माण झालेला आहे. जनावर तो जनावर असतो मालकाच्या हातून सुटून गेलेला, कोंडवाडा ठेकेदाराच्या किंवा नगर परिषदेच्या निदर्शनात आला तर त्याला मोकाट जनावर म्हणून बंदिस्त केला जातो पण त्याही ठिकाणी त्या जनावराची जनावरापेक्षाही बिकट हाल होत असेल तर त्याला कोंडवाडा म्हणावे की जनावराचा काळ्यापाण्याची शिक्षा असाही प्रश्न निर्माण होत असतो. म्हणूनच नगरपरिषद प्रशासनाने त्वरित कोंढवाड्याची दुरुस्ती करून कोंडवाड्यात बंदिस्त होणाऱ्या जनावरांच्या चारा पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli armori news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here