– देसाईगंज पोलिसांची धडक कारवाई
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, १२ जानेवारी : तालुक्यातील विसोरा जंगल परिसरात कोंबडा बाजारावर देसाईगंज पोलिसांनी धाड टाकून दुचाकी वाहनांसह २ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केली असून या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाब शेगोजी अवसरे, दिनेश मारुती वझाड, नरेंद्र नथुजी दहीकर, भरत हिरामण सहारे, तेजराम डोमा भुते, अशोक तुकाराम बुद्दे, उमेश कालिदास कोरडे, नाकाडे अशी आरोपींची नावे आहेत.
देसाईगंज तालुक्यातील विसोरा जंगल परिसरात कोंबडा बाजार भरत असून कोंबड्यावर पैशाची बाजी लावून जुगाराच्या खेळ खेळत असल्याबाबत बाबतची गोपनीय माहिती देसाईगंज पोलीसांना मिळाली असता पोलीस निरीक्षक महेश मेश्राम व महिला पोलीस उपनिरीक्षक सोनम नाईक यांचे मार्गदर्शनात सफौ वासुदेव अलोने सह पोलीस पथक व पंचा समक्ष कोंबडा बाजार भरत असलेल्या ठिकाणी धाड टाकली असता आरोपीच्या ताब्यातून ७ हजार रुपये, मृत अवस्थेत असलेला कोंबडा ०१ नग, जिवंत असलेला कोंबडा ०१ नग किंमत ५०० रुपये तसेच ०२ नग लोखंडी कात्या, ०४ दुचाकी वाहन असा एकूण २ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सोनम नाईक करीत आहे. सदर कारवाईने कोंबडा बाजारावर जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
(The Gadvishava) (Gadchiroli News) (Veera Simha Reddy) (Swami Vivekananda Birthday) (HBSE Date Sheet 2023) (PAK vs NZ) (Golden Globes 2023) (Muktipath) (Wadsa – Desaiganj)