जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथे मतदार जागृती

71

The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ३० : येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जागृती कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी मतदान कशा पद्धतीने केल्या जाते आणि कशासाठी हे आई वडिलांना पटवून द्यावे याबाबत कार्यक्रमातून पटवून देण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रशांत साळवे, डॉ. रश्मी डोके, प्रशांत तोटावार, किरण दरडे हे होते. लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक असल्यामुळे प्रत्येक नागरिकांनी मतदान केले पाहिजे तसेच कोणत्याही वाईट मार्गाला बळी न पडता निपक्षपातीपणाने मतदान करणे गरजेचे आहे तसेच प्रत्येक मुलाच्या आईवडिलांनी मतदान करायलाच पाहिजे असे यावेळी मार्गदर्शक करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन ओम देशमुख यांनी केले तर आभार हर्षल गेडाम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता वर्ग अकरी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here