-शक्तिपथ स्त्री संघटना गठीत
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : धानोरा तालुक्यातील मेंढा येथे मुक्तिपथ व गाव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शक्तिपथ संघटना गठीत करण्यात आली. यावेळी गावात मागील अनेक वर्षांपासून असलेल्या दारूबंदीचे महत्व इतरही गावांना कळावे, या उद्देशाने दारूबंदीचा विजयस्तंभ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
धानोरा तालुक्यात मेंढा या गावात मुक्तीपथ शक्तिपथ स्त्री संघटना बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला गावातील संपूर्ण महिला उपस्थित होत्या. यावेळी गीत, खेळ व आरोग्यावर सहभागी चर्चा करून कमजोरी बाबत सविस्तर माहिती देत ते दूर कशी होईल यावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर गावात शक्तीपथ महिला संघटना तयार करून पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. वेगवेगळ्या कृती कार्यक्रमाकरिता यादी तयार करण्यात आली. यावेळी आमचा गाव दारुमुक्त गाव ही माहिती संपूर्ण जगभर माहित व्हावी याकरिता गावात विजयस्तंभ उस्तव सण साजरा करण्याचे ठरविले. शेवटी दारूबंदीचे नारे देत हा कार्यक्रम आटोपला गेला. यावेळी सरपंच नंदाताई दुगा, शक्तीपथ संघटना अध्यक्ष तारा दुगा, उपाध्यक्ष जयश्री पदा, सचिव पिंगला दुगा व गावातील महिला, मुक्तीपथ तालुका संघटक राहुल महाकुलकर, भास्कर कड्यामी, जीवन दहिकर उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )