माळंदा येथे जय पेरसापेन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बांधला वनराई

287

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ३ जानेवारी : तालुक्यातील माळंदा येथील जय पेरसापेन हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी सामळा नदीवर “पाणी अडवा पाणी जिरवा ” या उपक्रमांतर्गत श्रमदानातून वनराई बंधारा बांधला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ए.एन.बढई, एल.डब्ल्यू. धूडसे, कु.ए.बी.शेख, सि.डी.गद्देवार, एस.पि.मारकवार, जि.एन.ठमके, ए.एस. संतोषवार उपस्थित होते.
“पाणी अडवा पाणी जिरवा ” या उपक्रमांतर्गत बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आल्याने बंधाऱ्याचा फायदा शेतकऱ्यांना, जनावरांना, पशु पक्षाना होनार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना’ ‘जलसंवर्धनाचे ‘ महत्त्व पटवून देण्यात आले. उपक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली. यावेळी संपूर्ण विद्यार्थ्यांनी मनसोक्तपणे पाण्याचा आनंद लूटला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here