जल जंगल जमीन या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग रोजगाराकरीता करा : आमदार कृष्णा गजबे

118

– कुरखेडा येथे ग्रामसभा संवाद मेळावा
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने), २१ ऑक्टोबर : पेसा श्रेत्रातील गावाचा जल जंगल जमीन व गौन उपजावर ग्रामस्थांचा कायद्याने हक्क आहे, या हक्कावर गदा येणार नाही, या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करीत ग्रामस्थाना रोजगार व उपजिवेकेचा संधी उपलब्धतेकरीता ग्रामसभानी सहकार्य करावे असे आवाहन आमदार कृष्णा गजबे यांंनी केले.
ग्रामसभा महासंघ व सृष्टि संस्था येरंडी यांचा संयुक्त विद्यमाने किसान मंगल सभागृह कुरखेडा येथे ग्रामसभा संवाद मेळाव्याचे आयोजन बूधवार रोजी करण्यात आले होते यावेळी प्रमूख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना आ.गजबे बोलत होते. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.देवाजी तोफा होते तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामसभा महासंघाचे सल्लागार डॉ. सतीश गोगूलवार, शहर विचार मंचाचे अध्यक्ष माधवदास निरंकारी, भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, किसान अधिकार मंचाची शूभदा देशमुख, एकात्मीक आदिवासी प्रकल्प अधिकारी पोरेड्डीवार नायब तहसीलदार गुडधे, गट विकास अधिकारी धिरज पाटील, नायब तहसीलदार बोके, जिल्हा परिवर्तन समीती नोडल अधिकारी चेतना लाटकर, कूमारीबाई जमकातन, महाग्रामसभा कोरचीचे निजामशहा काटेंगे, बाजीराव नरोटे, प्रदिप बोगा, महाग्रामसभा कूरखेडा/वडसा चे अध्यक्ष मानीक पोटावी, सचिव प्रेमलाल किरनापूरे, प्रकल्प समन्वय देवराव ठेंगरी आदि उपस्थित होते.
कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना देवाजी तोफा यांनी वन हक्क म्हणजे जन हक्क आहे हे समजून घेण्याकरिता कालेज, नालेज व विलेज या क्षेत्रातील व्यक्तीने ज्ञान घेणे व त्या ज्ञानाच्या माध्यमातून ग्रामसभा सशस्तीकरण करणे होय. ग्रामसभांना संबोधित करणे हे म्हणजे ग्रामसभेचा सशक्तीकरण, हक्क व अधिकाराची माहीती देत महाग्रामसभाना चळवळीचे रूप देण्याचे आवाहन केले .
यावेळी महाग्रामसभेचे क्रीष्णा नरोटे यानी मार्गदर्शनातून महाग्रामसभा कुरखेडा/ वडसा यांचा कार्य व कार्यपद्धतीचा लेखा-जोखा सादर केला तर प्रस्ताविकातून सृष्टि संस्थेचे संयोजक केशव गूरनूले यांनी महाग्रामसभेची वाटचाल व या दरम्यान उपस्थीत होणाऱ्या तांत्रिक अडचणी याकरीता शासकीय स्तरावर करण्यात येणारा पाठपूरावा याबाबद विस्तृत विवेचन केले. यावेळी मान्यवरांचा हस्ते केशव गूरनूले यांचा संकल्पनेतून साकारलेली या वन हक्क अधिकार व कायदे या पूस्तकीचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश खूणे तर आभार मनोज चव्हाण यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येत कुरखेडा, कोरची व धानोरा तालुक्यातील ग्रामस्थ‌ मोठ्या संख्येत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here