The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २८ : गडचिरोली जिल्ह्यात अद्यापपर्यंत रेतीघाट सुरू झाले नाही. त्यामुळे शासनाच्या महसूल विभागाचा कोट्यावधीचा महसूल बूडत आहे .हा महसूल रेती माफियाच्या घशात जात असून याकडे महसूल विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा प्रकार दिसून येत आहे. तरी महसूल विभाग याकडे जातीने लक्ष देतील का? असा प्रश्न जनता विचारीत आहे. याचा उत्तम उदाहरण म्हणजे धानोरा तालुक्यातील सालेभट्टी ग्रामपंचायत अंतर्गत वडगाव येथे नरेगाच्या अंतर्गत जिल्हा परिषद शाळा ते टोली रस्ता अंदाजे २०० मीटर रस्ता बांधकाम सुरू असलेल्या कामांमध्ये दिसून येते.
वडगाव येथे नरेगा योजनेतून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे .सदर बांधकामांचे अंदाजपत्रक २४ लाखाच्या घरात असल्याचे बोलले जाते. या रस्त्याच्या बांधकामात शासकीय नियमाप्रमाणे कर भरूनच वैध साहित्य खरेदी करावे लागते असा नियम शासनाच्या परिपत्रकात आहे. याला हरताळ फासत येथील काम करणाऱ्या यंत्राने जवळपास असलेल्या कठाणी नदीवरून चक्क रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरद्वारे अवैध रेती वाहतूक करून काम करीत आहे. जवळच दीड ते दोन किलोमीटर अंतरावर वडगाव येथे नरेगा मार्फत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे .त्या कामांमध्ये गिट्टी ही जशी एक एक करून ठेवल्या जाते त्या प्रकारे तिथे दिसून येत आहे . बांधकामचे फलक लावण्यात आले नाही. सदर कामांमध्ये अनियमितता असल्याचे गावकरी सांगतात. रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
हाकेच्या अंतरावरील तलाठी कार्यालयाला याची माहिती माहिती नाही का? किंवा झोपेचे सोंग तर घेतले नाही ना? किंवा संबंधित महसूल विभाग व यंत्रणा यांची मिली भगत तर नाही ना? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत .एकीकडे नरेगाच्या कामासाठी नरेगाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी अवैध रेतीचा वापर होत आहे तर दुसरीकडे घरकुल बांधणारे यांना पाच ब्रास रेती शासन उपलब्ध करून देत नाही. घरकुल बांधण्यासाठी रेती मिळत नाही. लिजची वाळू उपलब्ध नसतानाही घराचे बांधकाम कसे करायचे असा प्रश्न लाभार्थ्यांना पडलेला आहे. पण मोठ्या यंत्रणांना आजही सिमेंट रस्ते इमारत, पुलाचे बांधकाम, नाला बांधकाम इत्यादी करण्याकरिता अवैध रेतीचा वापर होत आहे. खाजगी कंत्राटदर मार्च एंडिंग च्या नावाखाली कोट्यावधीचे कामे जोरात सुरू आहे.
संबंधित कामाच्या ठिकाणी मंडळ अधिकारी व तलाठी यांना पाठवून कामावर असलेल्या रेती कुठून आणली आहे त्याची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल
– ए. बी. लोखंडे
तहसीलदार धानोरा
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath)