जैन कलार समाज न्यासची बिनविरोध निवडणूक

327

The गडविश्व
ता. प्र / देसाईगंज, ७ डिसेंबर : जैन कलार समाज न्यास गडचिरोलीची निवडणूक बिनविरोध झाली. जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी बिनविरोध निवडून आले. सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाल्याने जैन कलार समाजाचा गडचिरोली जिल्हा निवडणुकीचा लाखो रुपयाचा खर्च वाचवून जिल्ह्यातील समाजबांधवांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे.
या कार्यकारिणीत अध्यक्षस्थानी रतन शेंडे यांची, तर सचिव म्हणून पांडुरंग पेशने यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून संदीप दहीकर, कोषाध्यक्ष अशोक हरडे, सहसचिव वैभव भिवापूरे, कार्यकारिणी सदस्य हेमंत डोर्लीकर, डॉ. उमेश समर्थ, मनोज बनपूरकर, महेश मुरकुटे, सुरेखा रणदिवे, अर्चना मानापुरे, विलास गोटेफोडे, वैशाली लाड, वर्षा शनिवारे, रवींद्र गोटेफोडे, प्रकाश समर्थ, वसंत भांडारकर, केवळराम किरणापुरे, पराग दडवे, गौरव नागपूरकर, अश्विन भांडारकर, वसंत फटिंग, गुलाब मानापुरे, रुपेश लाड, राजेंद्र घुगरे यांची निवड करण्यात आली.
जिल्हा कार्यकारिणी बिनविरोध निवडीसाठी भूषण समर्थ, विनोद शनिवारे, प्रदीप रणदिवे, मनोज कवठे, सुधीर शेंडे, किशोर भांडारकर, प्रदीप लाड, अल्केश शनिवारे, धनराज गुरु, वासुदेव लाड, दिलीप दडवे, गणेश हरडे, हिराजी बनपूरकर, स्वाती कवठे, लता मुरकुटे, भाग्यश्री शेंडे, अर्चना भांडारकर, सरिता पेशने, स्नेहा शेंडे, शारदा हजारे, मनीषा हरडे व जैन कलार समाजबांधवांनी सहकार्य केले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here