गडचिरोली : दुचाकींच्या धडकेनंतर ट्रकने चिरडले, चिमुकलीसह दोघेजण ठार

1535

– तिघेजण गंभीर जखमी
The गडविश्व
गडचिरोली, दि.२७ : दुचाकींच्या धडकेनंतर ट्रकने चिरडल्याने झालेल्या अपघातात चिमुकलीसह दोघेजण ठार झाल्याची घटना आष्टी-चामोर्शी मार्गावरील चितरंजनपूर (येनापुर) येथे २७ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. रामेश्वर गंगाधार कुंभमवार (वय ४२) रा. अनखोडा ता. चामोर्शी, रिया धनराज वाढई (वय ८) रा. जामगिरी ता. चामोर्शी असे अपघातातील मृतकांची नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर कुंभमवार हे आपल्या दुचाकीने चामोर्शीकडे जात होते तर जामगिरी कडुन धनराज वाढई हे आपल्या मुलीसह दुचाकीने आष्टीकडे जात होते दरम्यान चितरंजनपूर येेथे दोन्ही दुचाकींची धडक झाल्याने ते रस्त्यावर कोसळले. दरम्यान याचवेळी गडचिरोली कडून आलेल्या ट्रकने रस्त्यावर कोसळलेल्या रामेश्वर कुंभमवार यांना चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातानंतर रस्त्यावर कोसळलेल्या रिया वाढईची सुद्धा प्राण ज्योत मालवली. या अपघातात नीलकंठ नागुलवार, धनराज वाढई व एक महिला गंभीर जखमी जाहले. त्यांना लागलीच रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. घटनेची माहिती कळताच आष्टी पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.
जिल्हयातील सुरजागड येथाल लोहखनिज वाहतुक जीवघेणी ठरतआहे . लोहखनिज वाहतूक करणारे ट्रक भरधाव वेगाने जात असल्याने अनेकदा अपघात घडले आहे. त्यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. सततच्या अपघाताने नागरिक संतप्त झाले असुन लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रकच्या वेगावर नियंत्रण मिळविणे आवश्यक असून याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here