धानोरा येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २९ : भारतीय जनता पार्टी, धानोरा तर्फे भारताचे माजी राष्ट्रपती व ‘जनतेचे राष्ट्रपती’ म्हणून ओळख असलेले डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ही श्रद्धांजली आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्यकक्षात आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थितांनी मौन पाळून त्यांना आदरांजली वाहिली. या वेळी त्यांच्या वैज्ञानिक योगदानाची, युवांना दिलेल्या प्रेरणादायी विचारांची आणि राष्ट्रनिष्ठेची आठवण करून दिली गेली.
कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. डॉ. कलाम यांचे विचार नव्या पिढीसाठी सदैव मार्गदर्शक राहतील, असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
