The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी गडचिरोली येथे भेट दिली असता गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्था द्वारे चालवणाऱ्या कृषी उत्पन्न व गौण वनौपजावर प्रक्रिया करणाऱ्या एमआयडीसी येथील पतदर्शी बांबू प्रकल्पाची केली पाहणी. भेटीदरम्यान प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना दिली. महाराष्ट्रामध्ये बांबूपासून फर्निचर तयार करणारे एकमेव असे प्रकल्प आहे. यामध्ये दोनशे ते अडीशे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाची संपूर्ण मशनरीज इमारत व प्रकल्पापासून उत्पादित होणाऱ्या उत्पादनाची माहिती दिली. यावेळी डॉ. विजयकुमार गावित म्हणाले की गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. हा प्रकल्प पर्यावरण पूरक असा उद्योग असून कृषीउत्पन्न व गौण वनौपजावर, बांबूवर प्रक्रिया करून बांबू टाईल्स व फ़र्निचर तयार करून गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराची चांगली संधी करून देत असल्याबाबत डॉ. नामदेवराव उसेंडी यांचे कौतुक केले. अशा प्रकारच्या नेतृत्वाला राज्यकर्ते व प्रशासनानी वेळोवेळी सहकार्य केल्यास वनावर आधारित असलेले प्रकल्प गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात तयार होऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक विकास होण्यास आर्थिक मदत होईल. बेरोजगारी दूर करण्याचे एक मोठे कार्य होऊ शकते. अश्यातच शासनाकडून जे मदत करता येईल ते मदत केली जाईल असे शब्द त्यांनी दिले. सोबतच त्यांच्या हस्ते प्रकल्प परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी माजी आमदार तथा गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सह.संस्थेचे अध्यक्ष डॉ. नामदेवराव उसेंडी, सीईओ विनायक वाढीवा, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,जेसा मोटवाणी, डॉ.विनय उसेंडी, पंकज खोबे, किशोर चापले, चेतन गुरनुले, सुहास कारंगामी, दत्ता कारंगामी, अशोक वाघाडे, गणेश मडावी, रवी वाघाडे, आशिष मेश्राम, मोहिनी मानकर, पूजा कपाटे, अंजली मेश्राम, राजमीना भोयर, उषा वाघाडे, मंजुषा वाघाडे, राजेश नरोटे व आदिवासी विकास विभागाचे कर्मचारी तसेच प्रकल्पातील इतर कामगार उपस्थित होते.