The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील जि.प. प्राथमिक शाळेत मुक्तिपथ तर्फे तंबाखू मुक्त शाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून हसत-खेळत पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यामंध्ये जागृती करण्यात आली. कार्यक्रमात १२६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
गाणे म्हणणे, सामुहिक खेळ, तंबाखूचे व दारूचे दुष्परिणाम, तंबाखूमुक्तिचे सैनिक, तंबाखू देणाऱ्या मित्राला नाही कसे म्हणनार, सहकारी मित्राला तंबाखू किंवा खर्रा खाण्याच्या सवयी पासून दूर करण्यासाठी प्रयत्न कसे करायचे, तंबाखू मुक्तिची होळी इत्यादी विविध कृतीची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना शाळेतील उपस्थित शिक्षकांना देण्यात आली. यासाठी मुक्तिपथ तर्फे बेतकाठी येथील शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोबतच विविध व्यसनमुक्तीपर गीत, विद्यार्थ्यांना तंबाखूपासून दूर ठेवण्यासाठी अनेक कृतिशील कार्यक्रम यावेळी घेण्यात आले. यावेळी स्पार्क कार्यकर्ता इच्छेश गुरनुले याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तसेच विविध खेळाच्या माध्यमातून हसतखेळत तंबाखूमुक्त शाळा निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी १२६ विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्त जीवन जगण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे नियोजन तालुका संघटिका निळा किन्नाके यांनी केले.