– सर्व खोल्यांत साचलाय पाणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ३१ : तालुक्यातील मुरुमगाव येथील महसूल मंडळ संकुलच्या स्लॅब मधुन टीप- टीप पाणी पडत असल्याने मुरुमगाव महसूल मंडळ संकुल कार्यालयाच्या सर्व खोलीत पाणी साचले आहे. त्यामुळे कामनिमित्य येणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. तर येथील पदाधिकारी व इतर लिपिकांना काम करणे कठीण जात आहे.
महसूल मंडळ संकूल कार्यालय कर्मचारीवर्ग आणि आप आपल्या कामा करीता आलेल्या जनतेला कामात बाधा निर्माण होत असून मोठा त्रास सहन करून घ्याव्या लागत आहे.
मुरुमगाव येथील महसूल मंडळ संकूल कार्यालय मध्ये शासकीय दस्तावेज खराब होण्याची संभावना आढळून येत आहेत. दोन महिन्या आगोदर मुरुमगाव येथील महसूल मंडळ संकूल कार्यालय दुरुस्ती करण्याचे काम करण्यात आले होते परंतु सध्या परिस्थितीत ह्या इमारतीतील सर्व कार्यालये पाण्याने चिंब चिंब झालेले आहे. एकही खोली अशी नाही की पाणी गळत नाही. त्याच प्रमाणेच जेव्हापासून हि राजस्व विभागाची ही इमारत महसूल मंडळ संकूल कार्यालय इमारत बांधण्यात आली आहे तेव्हा पासून या इमारतीत विद्युत प्रवाह खंडित आहे. इमारतीत लाईट, पंखे लावलेली आहेत परंतु ते बंद पडलेले दिसतात या इमारतीत केरकचरा पण आढळून आलेला आहे. तसेच महसूल मंडळ संकुल कार्यालय मुरुमगाव येथील मंडल अधिकारी समेत संपूर्ण तलाठी वर्ग मुख्यालयी उपस्थित राहत नाहीत. तरी सबंधित विषयावर सबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रित करून याचे निराकरण करण्यात अशी जनतेची मागणी आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanora )