पथकाच्या माध्यमातून सुरजागड यात्रा करणार दारू व तंबाखूमुक्त

266

– देवस्थान समिती, मुक्तिपथचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, ६ जानेवारी : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे 5 जानेवारी पासून तीन दिवशीय ठाकूरदेव यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेमध्ये जिल्ह्यातीलच नव्हे तर लागूनच असलेल्या बस्तर भागातील आदिवासीबांधवही मोठ्या संख्येने सहभागी होतात . दरवर्षी प्रमाणे यंदाही देवस्थान समिती, मुक्तिपथ व परिसरातील जनतेच्या प्रयत्नातून ही यात्रा शंभर टक्के दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी स्वयंसेवकांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहेत.
सूरजागड यात्रा तीन दिवस चालणार आहे.या यात्रेत ५० हजार भावीक येण्याची शक्यता आहे. ही यात्रा खर्रा तंबाखूमुक्त करण्यासाठी मुक्तीपथ व देवस्थान समितीची बैठक पार पडली. या बैठकीत यात्रेत खर्रा विक्री करणाऱ्याकडून समिती ५ हजार रुपये दंड व विदेशी दारू विक्री केल्यास १० हजार रुपये दंड घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार धार्मिक ठिकाणी कुणीही दारू किंवा खर्रा सेवन करून येऊ नये, यासाठी सुरजागड येथील यात्रा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी देवस्थान समिती व परिसरातील जनतेच्या सहकार्याने मुक्तीपथ अभियानातर्फे सलग तीन दिवस जनजागृती करण्यात येणार आहे. यात्रेच्या ठिकाणी बॅनर तसेच प्रदर्शनी लावून दारू व खर्रा सेवनाचे दुष्परिणाम सांगत सुव्यवस्थित यात्रा पार पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. स्वयंसेवक यांचे भरारी पथक तयार करण्यात आले आहेत. स्वयंसेवक चमू द्वारे यात्रेत देख रेख चालणार आहे.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Crystal Palace vs Tottenham) (Barcelona) (Leeds United vs West Ham) (Varisu Trailer) (Ssc.nic.in) (Muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here