कुरखेडा–बेडगाव घाटात थरारक अपघात : अवजड ट्रक रिव्हर्स घसरला, दोन दुचाकी चिरडल्या

102

कुरखेडा–बेडगाव घाटात थरारक अपघात : अवजड ट्रक रिव्हर्स घसरला, दोन दुचाकी चिरडल्या
– तिघे गंभीर जखमी
The गडविश्व
ता.प्र / कोरची, दि. ३० : कुरखेडा–बेडगाव मार्गावरील वळणदार घाटात सोमवारी (दि. २९ डिसेंबर) दुपारी भीषण अपघात घडला. छत्तीसगडकडे लोखंडी कच्चा माल घेऊन जाणाऱ्या अवजड ट्रकने अचानक रिव्हर्स घेत नियंत्रण गमावल्याने मागून येणाऱ्या दोन दुचाकी ट्रकखाली सापडल्या. मात्र प्रसंगावधान राखत दुचाकीस्वारांनी उडी मारल्याने मोठी जीवितहानी टळली. या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले असून दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.
मालवाहू ट्रक (क्रमांक सीजी ०७ बीई-५७१८) ९ किमीच्या घाटमार्गावर चढत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रक उलट दिशेने घसरत रिव्हर्स गेल्याने मागे येणाऱ्या दुचाकी थेट ट्रकखाली आल्या. दुचाकीस्वारांनी क्षणाचाही विलंब न करता उडी मारल्याने प्राण वाचवले, मात्र उडी मारताना तिघे गंभीर जखमी झाले.
जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. त्यापैकी दोघांना खासगी वाहनाने पुराडा येथे, तर एक जखमी रुग्णवाहिकेद्वारे कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पुराडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून फरार चालकाचा शोध घेतला जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Korchi #KurkhedaBedgaonRoad #GhatAccident #TruckAccident #RoadAccident #BreakingNews #MaharashtraNews #GadchiroliNews #HeavyVehicleAccident #TwoWheelerAccident #RoadSafety #AccidentNews #TruckLostControl #EmergencyResponse #PoliceInvestigation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here