पोलीस नक्षल चकमकीत तीन नक्षली ठार

1966

– प्रेस नोट प्रसिद्ध करून नक्षल्यांनी मृत्यूची दिली माहिती
The गडविश्व
बिजापूर, दि. २१ : जिल्ह्यातील धर्माराम पोलीस कॅम्पवर नक्षल्यांनी १६ जानेवारी रोजी हल्ला केला होता. दरम्यान दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात पोलिसांनी तीन नक्षल्यांचा खात्मा केला आहे. २१ जानेवारी रोजी नक्षल्यांनी एक प्रेस नोट प्रसिद्ध करून ठार झालेल्या नक्षल्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहे. तर हे तिघेही मोठ्या संवर्गातील नक्षलवादी असून ते गेल्या अनेक वर्षांपासून मावा संघटनेच्या सहकार्याने कार्यरत होते. याबाबतचे वृत्त एका वृत्तसंस्थेने प्रसिध्द केले आहे.
नक्षली प्रवक्ता समता यांनी एक प्रेस नोट जारी केली आहे. ज्यामध्ये १६ जानेवारी रोजी धर्माराम पोलिस कॅम्पवर नक्षल्यांच्या पीएलजीएने हल्ला केल्याचे म्हटले आहे. अनेक तास चकमक सुरू होती मात्र पोलिसांच्या गोळीबारात त्यांचे सहकारी करटम देवा, मडकम देवा, मुचाकी विक्रम या तिघांना गोळी लागली आणि ठार झाले. त्याच रात्री नक्षल्यांनी तिघांच्या मृतदेहाला आपल्यासह घेऊन गेले त्यानंतर बस्तर च्या जंगल परिसरात मृतक तीन नक्षल्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला. त्यावर किती रुपयांचा बक्षीस होता, कोणकोणत्या मोठ्या घटनेत त्यांचा सहभाग होते हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here