अरततोंडी पहाडीवर जबरी चोरी करणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या

1672

-तीन दिवस पोलीस कोठडी, चोरी केलेला मुद्देमाल जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : जिल्ह्यातील अरततोंडी, पळसगांव महादेव पहाडी येथे दोन इसमांचे मोबाईल व पैसे जबरजस्ती हिसकावुन चोरुन नेल्याप्रकरणी देसाईगंज पोलिसांनी अत्यंत शिताफीने पाठलाग करून दोघांच्या मुसक्या आवळल्या. बादलसिंग नैतरसिंग टाक (वय ३२),अनमोलसिंग निर्मलसिंग टाक (वय २८) दोघेही रा. अर्जुनी मोरगाव सिंगलटोली वार्ड नं. २, तह. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया असे आरोपीचे नाव असून जबरीने चोरुन नेलेला एकुण १४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.
पोस्टे देसाईगंज प्रभारी अधिकारी पोनि. अजय जगताप यांचे आदेशान्वये सपोनि. संदिप आगरकर व पोस्टे स्टाफ हे १ एप्रिल रोजी पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलींग करीत असतांना, प्रभारी अधिकारी यांना अरततोंडी, पळसगांव महादेव पहाडी येथे दोन इसमांचे मोबाईल व पैसे जबरीे हिसकावुन चोरुन नेल्याची गोपनीय माहिती दिली असता माहितीच्या आधारे सपोनि. आगरकर व पोस्टे स्टाफ यांचे एक पथक तात्काळ महादेव पहाडी पळसगांव येथे गेले. जय सहदेव दोनाडकर रा. बरडकीन्ही तह. ब्राम्हपूरी जि. चंद्रपूर यांनी घडलेली आपबीती सांगितली. त्याआधारे सपोनि. आगरकर व त्यांच्या पोलीस स्टाफ यांनी जय ला सोबत घेऊन महादेव पहाडी वरील झुडपी जंगलात शोध घेतला असता, दोन अनोळखी इसमांनी त्यांना पाहताच पळ काढला. सदर पळुन जाणा­ऱ्य दोन अनोळखी इसमांना पोलीस पथकांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपीकडून गुन्ह्रात जबरीने चोरुन नेलेला एकुण १४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने जय च्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध पोस्टे देसाईगंज येथे कलम 392, 34 भादंवि अन्यये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास सपोनि. आगरकर करीत असून, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपीतांना न्यायालयाने 03 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे देसाईगंज पोनि. अजय जगताप, सपोनि. संदिप आगरकर, पोअं विलेश ढोके, पोअं शैलेश तोरपकवार यांनी केलेली आहे.
(#thegdv #crimenews #gadchirolinews #gadchirolipolice #desaiganj )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here