मृतक महिलेच्या मुलाला मिळाला प्रधानमंत्री जिवनज्योती विमा योजनेचा लाभ

765

The गडविश्व
ता.प्र / चामोर्शी, १६ मे : तालुक्यातील विठ्ठलपूर येथील निरंजना साईनाथ भोयर यांचा अल्पशः आजाराने १८ सप्टेंबर २०२२ रोजी मृत्यू झाला होता. त्यांचा मुलगा षडानंद साईनाथ भोयर याला आज बॅंक ऑफ इंडीया येनापूर शाखेत प्रधानमंत्री जिवनज्योती विमा योजनेतून २ लाख रूपये खात्यात जमा करण्यात आले. यामुळे भोयर कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
प्रधानमंत्री जिवनज्योती विमा योजनेचा लाभ केवळ वार्षिक ४३६ रूपये हप्ता भरून वयाच्या १८ ते ५५ वर्षापर्यंत घेता येते. या योजनेत विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसानांना २ लाख रूपयांची भरपाई मिळते. ही योजना दरवर्षी १ जून ते ३१ मे पर्यंत राबविण्यात येते. दरवर्षी ४३६ रूपये भरून या योजनेचे नुतणीकरण करण्यात येते.
निरंजना साईनाथ भोयर यांनी प्रधानमंत्री जिवनज्योती योजनेचा हप्ता बॅंक ऑफ इंडीया शाखा येनापूर येथे भरलेला होता. त्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ मिळण्याकरीता बॅंक सखी आम्रपाली झाडे, आयसिआरपी सुशिला पाल, बिएमएफआय भावना रामटेके, बॅंक मित्र राजु सातर, शामराव जक्कुलवार, महेश पोतराजवार यांनी सहकार्य केले. यामुळे आज १६ मे रोजी मृतक निरंजना भोयर यांचा मुलगा षडानंद भोयर याच्या खात्यावर सदर विम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.
याप्रसंगी बॅंक ऑफ इंडीया शाखा येनापूरचे शाखा व्यवस्थापक तुषार रामटेके, दिग्वीजय परचाके, सौरभ बन्सोड, मृतक महिलेचे पती साईनाथ भोयर व बॅंकेचे कर्मचारी उपस्थित होते.
(the gdv, the gadvishva, gadchiroli, chamorshi, yenapur, bank of india)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here