थाटात पार पडला वृंदावन काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा

131

– मान्यवरांनी उद्धळले कवयित्री वृंदा पगडपल्लीवार वर स्तुतीसुमने
The गडविश्व
ता.प्र / सावली, २७ मार्च : झाडी बोली साहित्य मंडळ गोंडपिपरी शाखेच्या वतीने रविवार २६ मार्च रोजी वर्धापन दिनाचे आयोजन खैरे कुणबी समाज भवन येथे करण्यात आले होते. या प्रसंगी कवयित्री वृंदा पगडपल्लीवार यांच्या अभंग संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन राजुरा नगरपरिषद चे माजी अध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष जेष्ठ कवी उद्धव नारनवरे जेष्ठ साहित्यिक, गोंडपिपरी, प्रमुख अतिथी म्हणून भाष्यकार चारूदत्त मेहरे, ज्येष्ठ साहित्यिक अकोला, सविता कुळमेथे, नगराध्यक्ष गोंडपिंपरी, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, केंद्रीय सदस्य झा.सा.मंडळ साकोली, प्राचार्य रत्नमाला भोयर महिलाध्यक्ष झा.सा.मंडळ चंद्रपूर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक झाडीबोलीचे जिल्हाप्रमुख अरुण झगडकर यांनी केले. तर कवयित्री वृंदा पगडपल्लीवार यांनी आपल्या मनोगतातून अभंग संग्रहाच्या निर्मितीवर प्रकाश टाकला. यावेळी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उपस्थित अतिथींच्या हस्ते करण्यात आले.
वृंदावन अभंग काव्यसंग्रहातून मानवी जीवनाविषयी चिंतन मांडले गेले आहे असे चारुदत्त मेहरे, ज्येष्ठ साहित्यिक अकोला यांनी वृंदावन अभंगसंग्रहावर भाष्य करताना म्हणाले. तर संत विचारांना समर्पित असा हा अभंग संग्रह असल्याचे बंडोपंत बोढेकर यांनी प्रतिपादन केले. अरूण धोटे यांनी या अभंगसंग्रहाला शुभेच्छा दिल्या.
पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन रत्नाकर चौधरी यांनी केले तर आभार प्रा. रमेश हुलके यांनी मानले.
प्रकाशनाच्या दुसऱ्या सत्रात कवयित्री सौ गायत्री शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here