The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मणका आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या सामान्य होत चालल्या आहेत. बैठी जीवनशैली, चुकीचे पोषण, शारीरिक श्रमाचा अभाव आणि वाढत्या वयोमानासोबत या समस्या अधिक गंभीर होत जातात. ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये या समस्यांचा वेळीच निदान न झाल्यामुळे गुंतागुंत वाढते आणि यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. या समस्या दूर करण्यासाठी सर्च हॉस्पिटल, चातगावने पुढाकार घेतला आहे.
सर्च हॉस्पिटलमध्ये सोमवार ते शनिवार मणका व सांधेदुखी तपासणीची नियमित सेवा सुरू आहे. ज्या रुग्णांना कंबरेचे दुखणे असून ते दुखणे पायात जाते, चालल्यावर ज्यांना ज्या पायात कमजोरी येते किंवा पायातील दुखणे वाढून थांबावे लागते, मणक्यात ग्याप आहे किंवा मणक्यातली नस चिपकली आहे, ज्यांना मणक्याची शस्त्रक्रिया सांगितली आहे, ज्यांच्या पाठीला वाक आहे, पाठ वाकडी आहे, ज्यांना मानेचे दुखणे आहे आणि हे दुखणे हातात जाते, सतत पाठीमद्धे दुखत असते या सर्व समस्या असलेल्या रुग्णांनी या तपासणीचा फायदा घ्यावा. या तपासणीत तज्ञ डॉक्टरांमार्फत योग्य निदान केले जाते. तपासलेल्या रुग्णांमधून ज्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल , त्यांच्यावर भारतातील नामवंत स्पाईन सर्जन डॉ.शेखर भोजराज व त्यांची टिम यांच्याद्वारे नोव्हेंबर 2024 मधील आयोजित कॅम्पमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येईल.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda #accidentpolicy #postoffice #muktipath )