मुरमगाव येथे पहिली शिक्षक परिषद उत्साहात संपन्न
– शिक्षण क्षेत्रातील नवे प्रवाह, उपक्रम व शिक्षकांचे मार्गदर्शन
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ३१ : पंचायत समिती गट साधन केंद्र, धानोरा अंतर्गत समूह साधन केंद्र मुरमगावच्या वतीने पहिली शिक्षक परिषद दि. ३० जुलै २०२५ रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरमगाव येथे उत्साहात पार पडली.
या परिषदेचे उद्घाटन केंद्रप्रमुख अरुण सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयडॉल पदवीधर शिक्षक चंदू रामटेके होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक शैलेश गेडाम, श्रीमती विना मडावी, घोसे, बाळकृष्ण बोरकर आदी उपस्थित होते.
परिषदेत आयडॉल शिक्षकांचे निकष, विद्यांजली पोर्टल, निपुण महाराष्ट्र अभियान, परख सर्वेक्षण निकाल, शिष्यवृत्ती नियोजन व मार्गदर्शन या विषयांवर सुलभक मार्गदर्शक म्हणून श्रीमती गायत्री खेवले, पुंडलिक पेंदाम, पांडुरंग कांबळे, नलिंद्र मुल्लेवार, श्रीमती माया भैसारे, जगदीश बावणे यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
शिक्षकांच्या यू-डायस प्लस, एक पेड माँ के नाम, तांत्रिक शंका व अडचणींवर केंद्रप्रमुख अरुण सातपुते यांनी सविस्तर समाधान दिले. परिषदेत ४५ शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन पांडुरंग कांबळे यांनी केले तर आभार श्रीमती मंगला वालको यांनी मानले. या परिषदेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकण्यात आले असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews
