जात वैधता प्रमाणपत्रांची ‘ती’ प्रकरणे त्रृटीत

136

– २४ ऑगस्ट ला कागदपत्रांसह उपस्थित होऊन सादर करण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, १९ ऑगस्ट : सन २०२३-२४ या सत्रात राखीव प्रवर्गातून व्यावसायीक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहित नमुन्यात (ऑनलाईन) अर्ज आवश्यक त्या दस्ताऐवजामध्ये समितीस १० ऑगस्ट २०२३ पर्यंत दाखल केले. अशी प्रकरणे निकाली (त्रृटीचे प्रकरणे वगळता) काढण्यात आलेले आहेत. तरी ज्या अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र त्यांच्या ई-मेल आय.डी.वर आजपर्यंत प्राप्त झालेले नाही. अशी प्रकरणे त्रृटीत असल्याने अर्जदारांनी मानीव दिनांकाचे जात व अधिवास पुराव्यासह कार्यालयीन वेळेत, २४ ऑगस्ट २०२३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली शासकीय आय.टी.आय. चौक, एल.आय.सी. रस्ता, कॉम्पलेक्स, गडचिरोली या कार्यालयात उपस्थित होऊन सादर करावे असे आवाहन उपायुक्त देवसुदन ना. धारगावे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here