दारू विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करा

46

– गड अहेरी वार्डातील महिलांची मागणी
The गडविश्व
गडचिरोली,७ डिसेंबर : अहेरी शहरातील गड अहेरी वॉर्डात सुरू असलेली अवैध दारूविक्री तत्काळ बंद करण्याची मागणी वॉर्ड संघटनेच्या महिलांनी केली आहे. सोबतच दारूविक्रेत्यांची यादी अहेरीचे पोलिस निरीक्षक यांना सादर करण्यात आली.
गड अहेरी वॉर्डात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. शांतता व आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे अवैध दारूविक्री बंद करणे गरजेचे झाले आहे. यासाठी पोलिस विभागाने सहकार्य करण्याची मागणी वॉर्ड संघटनेच्या महिलांनी केली आहे. सोबतच वार्डातील दारूविक्रेत्यांची यादी सादर करीत पोलिस निरीक्षक यांच्याशी वॉर्ड संघटनेच्या महिलांनी चर्चा केली.

(The Gadvishva) (Gadchiroli) (Muktipath) (Gadchiroli News Updates)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here