सुमेधा इंस्टीटयुट ऑफ एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय ॲबकस स्पर्धेत सुयश

227

The गडविश्व
गडचिरोली, २७ जून : स्मार्ट किड ॲबकसच्या माध्यमातून नागपूर येथे राज्यस्तरीय ॲबकस स्पर्धा २५ जून २०२३ रोजी पार पडली. या स्पर्धेत गडचिरोली येथील सुमेधा इंस्टीटयुट ऑफ एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे.
राज्यस्तरीय ॲबकस ची २०२३-२४ स्पर्धा नागपूर येथे पार पडली. या स्पर्धेत राज्यातील ६०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात गडचिरोली येथील सुमेधा इंस्टीटयुट ऑफ एज्युकेशन ॲकडमीच्या १८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा च्या माध्यमातून अवघ्या पाच मिनीटाट १०० गणित सोडविण्याची स्पर्धा घेतल्या जाते. या स्पर्धेत कुमारी वेदिका उमेश राठोड हिने प्रथम क्रमांक पटकाविले आहे. तर कुमारी गायत्री विलास सिडाम हिने व्दितीय, कुमारी निधी प्रकाश चौधरी हिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच कु.वेदांती चिल्लमवार, कु. अग्रीमा चिल्लमवार, कु. सुमिधा कार्लेकर, कु. यश्मीत कार्लेकर, कु. श्रावणी ठाकरे, कु. राजेश्वरी झंझाळ, कु. अर्णव बोरकर, कु. दिप मरस्कोल्हे, कु. आदित्य माकडे, कु. स्वरा समर्थ, कु. अनघा मैलारे, कु. अनन्या देवकाटे, कु. फलश्री भानारकर, कु. अथांग भानारकर, कु. जागृती मस्के या विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केले.
या विद्यार्थ्यांना ॲबकसच्या माध्यमातून घडविण्याचे काम सुमेधा इंस्टीटयुट मधील सौ. छाया कार्लेकर, कु. मनिषा इंगळे, कु. लुकेश आत्राम, प्रा. पुरूषोत्तम काळबांधे व चमुतील इतर सहकारी व विद्यार्थ्यांचे पालक यांनी सहकार्य केले.
(Suyesh of Sumedha Institute of Education students in state level abacus competition, gadchiroli news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here