-मुक्तिपथच्या मार्गदर्शनात यशस्वी प्रयत्न
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : तालुक्यातील नगरी गावातील विक्रेत्यांवर पोलिस विभागाच्या माध्यमातून वारंवार कारवाई करून गावातून अवैध दारू हद्दपार करण्यात मुक्तिपथ गाव संघटनेला यश आले आहे. मुक्तिपथच्या मार्गदर्शनात मागील दोन वर्षांपासून गावात दारुबंदी कायम ठेवण्यासाठी गाव संघटनेने यशस्वी प्रयत्न केले आहे.
पूर्वी नगरी येथे मुक्तिपथ गाव संघटनेने दारुविक्रेत्याना वारंवार सुचना देऊनही न मानल्याने अखेर अहिंसक कृती करून दारूविक्रेत्यांना धडा शिकविण्यात आला. गाव संघटनेच्या अथक प्रयत्नानंतर गावात दारुबंदी करण्यात आली. त्यांनतर ग्रामपंचायत निवडणुकीनंतर गावात दोन दारुविक्रेते गावाच्या बाहेर विक्री करू लागले. बघता बघता त्यांनी गावात सुद्धा विक्रि करायला सुरवात केली. त्यामुळे गावात दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली. झगडे, भांडण वाढले होते . यामुळे गावात महिलांची संघटना मजबूत करून दारूविक्रेत्यांची दारू पकडून नष्ट केली. गावातील महिलांनी दारूविक्रेत्यांविरोधात वारंवार कृती करून गावातील अवैध दारूविक्री पूर्णतः बंद केली. या गावातील संघटनेच्या पुढाकारातून आज नगरी हे गाव दारूविक्रीमुक्त गाव म्हणून नावारूपास आले आहे. गावात मागील दोन वर्षांपासून अवैध दारूविक्री बंद असल्याने शांतता व सुव्यवस्था कायम आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )