एकाच दिवशी होणारे दोन बालविवाह थांबविण्यास यश

1056

– चाईल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाची कार्यवाही
The गडविश्व
चंद्रपूर, दि.०८ : जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील गावात बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी चंद्रपूर आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चाइल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी दोन्ही बालिकेच्या बालविवाह होत असलेल्या गावात पोहचून ग्रामीण बाल संरक्षण समिती सदस्यांच्या मदतीने दोन्ही बालविवाह थांबविल्याची कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यातील पालकांच्या समुपदेशाने जिल्ह्यात एकाच दिवशी दोन बालविवाह रोखण्यात चाईल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाला यश प्राप्त झाले. विशेष म्हणजे जिवती तालुक्यातील 5 बालविवाह यावर्षी यंत्रणेनी थांबविले आहे. चंद्रपूरपासून दूर अंतरावर असलेल्या जिवती तालुक्यातील गावांमध्ये बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती चाईल्ड हेल्पलाईन च्या 1098 क्रमांकावर मिळाली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी चंद्रपूर आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम दोनही बालिका अल्पवयीन असल्याचा पुरावा सहाय्यक संरक्षण अधिकारी परविन शेख, अंगणवाडी सेविका व सुपरवायजर यांच्या मदतीने प्राप्त करण्यात आला.दरम्यान दोन्ही बालविवाह थांबवून दोन्ही अल्पवयीन बालिकांच्या कुटुंबाकडून बालविवाह करणार नसल्याचे शपथपत्र लिहून घेण्यात आले. या संपूर्ण कारवाही दरम्यान जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, चाईल्ड हेल्पलाईनचे अभिषेक मोहुर्ले, प्रकल्प समन्वयक प्रदिप वैरागडे, सुपरवायझर अंकुश उराडे, किरण बोहरा आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या हर्षा वऱ्हाटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

(#thegadvishva #thegdv #gadchirolinews #gadchirolipolice #chandrpuenews #balvivah)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here