– स्पर्श संस्थेचा उपक्रम
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, १८ जुलै : तालुक्यातील गिरोला अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा येथे स्पर्श गडचिरोली आणि कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन च्या एक्सेस टू जस्टिस प्रकल्पा अंतर्गत बालविवाह या अनिष्ट प्रथेचा समुळ नष्ट करण्याकरिता बालविवाह विरुद्ध शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्पर्श कार्यकर्ते वैभव के. सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना बालविवाहामुळे होणारे नुकसान यावर मार्गदर्शन करून वय पूर्ण होईपर्यंत विवाह न करण्याची शपथ शालेय विद्यार्थ्यांनी घेतली.
यावेळी श्री. डब्ल्यू .के .बावणे माध्यमिक मुख्याध्यापक, जे .आर. कटरे प्राथमिक मुख्याध्यापक, रोहन जक्कनवार अधीक्षक, कु. एम.पी सातपुते अधीक्षिका तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
