धानोरा नगरपंचायत येथील पथविक्रेता निवडणूक बिनविरोध

178

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०३ : स्थानिक नगरपंचायत अंतर्गत पंथ विक्रेता निवडणूक २०२४ बिनविरोध करण्यात आली.
येथील पथविक्रेता संघटनेमध्ये एकूण २३ सदस्य होते. त्यातील ८ जणांची समिती तयार करावयाची होती. त्यात एक विकलांग व अनुसुचित जाती चे महिला आरक्षण निघाले परंतु सदस्या मध्ये एकही विकलांग महिला नसल्यामुळे ती जागा रिक्त ठेवण्यात आली व अनुसूचित जाती मधील जात प्रमाणपत्र नसल्यामुळे ती सुद्धा रिक्त ठेवून समितीमध्ये निरंजना कालिदास भंडारे, बंडू सोमा हरणे, जहागीर पीर ममद शेख, धर्मेंद्र मशाखेत्री, सखाराम लेनमुरे, पायल दादाजी पोवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी नगरपंचायत धानोरा प्रितिश अ. मगरे यांनी यांची घोषणा केली. तसेच सर्वच बिनविरोध निवडून आलेल्या सभासदांचे अभिनंदन करण्यात आले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here