सर्च मध्ये मणक्यांच्या शस्रक्रियांचा मागील उच्चांक कायम

208

The गडविश्व
गडचिरोली, १६ डिसेंबर : जिल्ह्यातील माँ दंतेश्वरी रुग्णालय येथे स्पाईन फाउंडेशन मुंबई आणि सर्च यांचे संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या मणक्यांच्या आजारांसाठी शस्रक्रिया शिबिरामध्ये भारतातील प्रसिद्ध स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज आणि त्यांचे सहकारी यांनी गडचिरोली सारख्या दुर्गम ठिकाणी दोन दिवसात एकूण २३ रूग्णांच्या शस्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहे.
शिबिरात मुंबई व नागपूर येथून आलेले स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज, डॉ. प्रेमिक नागद, डॉ. हर्षित दवे, डॉ. रघुप्रसाद वर्मा, डॉ. शीतल मोहिते, डॉ.समीर कोलकटवार डॉ. शिवकुमार, डॉ. हरीकृष्णन, डॉ. तोहशीफ अहमदभूल तज्ञ डॉ. सचिन डोंगरवार, डॉ.निरुप्मा बनसल, डॉ.सुनील कातकडे आणि डॉ.स्नेहल केरकर, अस्तिरोग तज्ञ डॉ.दिपेंद्र तोमार, रिह्याब टीम इंडियाचे तज्ञ फिजिओथेरपिस्ट डॉ. गौरीष केंकरे, डॉ. लक्षिता जैन व सर्च रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वच्या सर्व शस्रक्रिया यशस्वी झाल्या असून रुग्णांना दिलासा मिळाला आहे. शस्रक्रिया झालेल्या रुग्णांना १२ दिवस नियमित फिजिओथेरपी उपचार करून त्यांना आपले दैनंदिन कामे करण्यास सक्षम करण्यात येत आहे.
मणक्याच्या दुखण्याच्या त्रासाने पीडित व जीवन असह्य झालेले रुग्ण शस्रक्रियेच्या चमत्काराने जीवनात नवीन आशा घेवून जात आहेत. सर्च रुग्णालयात मान, पाठ, कंबरदुखी, संधिवात, अस्थिरोग या त्रासांसाठी अद्यावात फिजिओथेरपी विभाग कार्यरत असून याची ख्याती सर्वदूर पसरत आहे.
ग्रामीण आणि आदिवासी भागातील मणके आणि सांधेदुखीच्या आजाराच्या उपचारासाठी रुग्णांना मुंबई सारख्या मोठ्या शहरात जाऊन ही सेवा घेणे शक्य होत नाही म्हणून अश्या आजारासाठी सर्व सोयींनी अद्ययावत अश्या माँ दंतेश्वरी रुग्णालय गडचिरोली या ठिकाणी अत्यल्प दरात मुंबई व नागपूर येथील नामांकित रुग्णालयातील तज्ञ सर्जन येवून समाजाप्रती असलेले ऋण व्यक्त करून सेवाभावी वृत्तीने सेवा देत आहेत. पुढील शिबिराचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी लवकर नोंदणी करण्याचे आवाहन सर्चचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता भलावी आणि संचालिका डॉ. राणी बंग यांनी केले आहे.
स्पाईन सर्जरी शिबीर यशस्वी केल्याबद्दल सर्च चे संचालक डॉ. अभय बंग यांनी सर्व टिमचे अभिनंदन केले.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Kuldeep Yadav) (Govinda Naam Mera) (Thailand Princess Bajrakitiyabha) (Horoscope) (Spine surgeries maintain previous highs in search)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here