The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करतांना अचानक हृदयविकाराचा धक्का बसल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना काल २३ एप्रिल रोजी गडचिरोली येथे घडली. सुरज निकुरे (वय २४) रा. भिकारमौशी असे युवकाचे नाव आहे. सदर घटनेने युवकाचे पोलीस बनण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.
सुरज हा पोलीस भरतीची तयारी करण्याकरिता गडचिरोली शहरात भाड्याने खोली करून राहत होता. अत्यंत गरीब परिस्थिती असतांना त्याने पोलीस बनण्याचे स्वप्न उराशी धरले आणि नुकत्याच निघालेल्या पोलीस भरतीचा अर्ज करून तो गडचिरोली येथे सराव करू लागला. मात्र नियतीला वेगळेच मान्य होते. नेहमीप्रमाणे सुरज काल धावण्याचा सराव करीत होता. दरम्यान त्याच्या छातीमध्ये दुखायला लागले व भोवळ येऊन हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाला. सुरजला पोलीस बनन्यापूर्वीच मृत्यूने कवटाळल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तो घरातील एकुलता एक मुलगा होता असे कळते. त्याच्या अशा मृत्यूने आई वडील व कुटुंबातील व्यक्तींना मोठा धक्का बसला असून दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #policebharti #policerecrutment )