धक्कादायक : आलापल्लीत अल्पवयीन आदिवासी मुलीवर अतिप्रसंग, दोघांना ठोकल्या बेडया

1133

– जिल्ह्यात संतापाची लाट
The गडविश्व
गडचिरोली, १२ जून : इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपले उत्तीर्ण प्रमाणपत्र घेण्यासाठी शाळेत गेलेल्या एका अल्पवयीन आदिवासी विद्यर्थिनीवर दोन युवकांनी अतिप्रसंग केल्याची घटना अहेरी तालुक्यातील आलपल्ली येथे १० जून रोजी रात्रो घडली. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी रोशन गोडसेलवार (२३) रा. आलापल्ली व निहाल कुंभारे (२४) रा. जीवनगट्टा, ता. एटापल्ली यांना बेडया ठोकल्या आहेत.
पीडित मुलगी ही आलापल्ली येथे एका शाळेत शिकत होती. इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी शनिवारी ती शाळेत गेली. निहाल कुंभारे याने तिला एका खोलीवर नेले त्यानंतर संध्याकाळी रोशन गोडसेलवार व निहाल कुंभारे यांनी त्या मुलीला जबरजस्ती करत मद्य पाजून तिच्यावर अतिप्रसंग केला व रविवार पहाटे तिला आलापल्ली येथील चौकात सोडून दिले. दरम्यान मुलीने चौकात आपल्यावर घडलेला प्रसंग जोरजोराने ओरडून संगीतला. यावेळी काही नागरिकांनी गप्प राहण्याचा सल्ला दिला तर काहींनी तुझीच बदनामी होईल अशी भीती दाखवत घरी परत जाण्यास सांगितले. तिने स्वागावी जाऊन आपल्या कुटुंबियांना आपबीती सांगितली असता कुटुंबीयांनी पीडित मुलीसह एटापल्ली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसानी पीडितेचे बायन नोंदवून अहेरी पोलिसांकडे तपास वर्ग केला. अहेरी पोलिसांनी रात्रो उशिरा रोशन गोडसेलवार व निहाल कुंभारे यांच्यावर गुन्हा दाखल करुन बेडया ठोकल्या. तर यातील प्रमुख आरोपी रोशन गोडसेलवार हा एका राजकीय पक्षप्रणित संघटनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती असून आणखी काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे तर सदर घटनेने जिल्हाभरात संतापही व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही विविध स्तरातून होत असून सोशल मीडियावर या घटनेचा निषेधही व्यक्त करण्यात येत आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli, etapalli, aheri, crime news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here