‘मार्क्स कोण होता?’ या विषयावर शेकापचा वैचारिक कार्यक्रम ५ मे रोजी

16

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : जगातील दारिद्र्य, शोषण आणि विषमतेविरुद्ध लढा देणाऱ्या, सर्वसामान्यांचा आवाज बनलेल्या विचारवंत काॅ. कार्ल मार्क्स यांच्या २०७व्या जयंतीनिमित्त शेतकरी कामगार पक्षातर्फे सोमवार, ५ मे २०२५ रोजी गडचिरोली येथे विशेष वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम दुपारी १२ वाजता मच्छी मार्केटजवळील शेकाप जिल्हा कार्यालयात होणार असून, ‘मार्क्स कोण होता?’ या विषयावर मार्गदर्शनपर चर्चा घेतली जाईल. समाज परिवर्तनाच्या लढ्यात मार्क्सचे विचार आज किती महत्त्वाचे आहेत, हे यानिमित्ताने समजून घेण्याची संधी कार्यकर्त्यांना मिळणार आहे. कार्यक्रमानंतर बिर्याणीचे भोजनही आयोजित करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम केवळ जयंती उत्सव नसून, भांडवलशाहीच्या विरोधात वैचारिक शस्त्राने सज्ज होण्याची प्रेरणा देणारा ठरणार आहे. जिल्हा, तालुका व गावस्तरावरील पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here