The गडविश्व
प्रतिनिधी / ढाणकी (प्रवीण जोशी ) १० मार्च : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज १० मार्च रोजी तिथीनुसार जयंती ढाणकी शहरात उत्साहात पार पडली. यावेळी जुन्या बसस्थानक परिसरात असलेल्या महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. दम्यान या प्रसंगी सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते.
बहुदा अनेक वैचारिक मतभेद पक्षपक्षांतर्गत असतात परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव काढताच सर्व मतभेद विसरून सर्वजण एका जागी येतात यातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जादुई करिष्मा आहे. तसेच शिवजयंती म्हणजे महाराष्ट्रासाठी एका उत्सवाप्रमाणेच असते. शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म झाला. भारतीय भूमीला अनेक राजे महाराजे लाभले परंतु रयतेचा राजा कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्या काळात सुद्धा महाराजांनी जातपाती बाजूला सारून अठरापगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन विशाल असे साम्राज्य उभे केले ते नेहमी जिद्दीने, चातुर्याने आणि निर्भीडपणे शत्रूला सामोरे गेले आणि विजयप्राप्त केला. म्हणूनच की काय विज्ञान युगात सुद्धा आणि युद्धप्रसंगी सर्व भौतिक बाबी प्राप्त असताना सुद्धा आजही शिवाजी महाराजांनी लढलेल्या लढाईचा अभ्यास करून आक्रमण झाल्याचे आपण बघतो आहे. महाराष्ट्र राज्याला लाभलेल्या किल्ल्याने वैभव आणि समुद्रातील आरमार ही छत्रपती शिवाजी महाराजांची देणगी होय. आजही तरुण मुले दरवर्षी गडकोट किल्ल्यांच्या अभ्यासासाठी पायी प्रवास करत असतात व महाराजांनी साकारलेल्या व उभारलेल्या राज्याची निर्मितीचा अभ्यास करण्यास तरुणाई कधी उत्सुकच असते.
यावेळी संजय कुंभवार, प्रशांत जोशी, संभाजी गोरटकर, कांता वासमवार, गजानन आजेगावकर, बंटी जाधव, रमेश गायकवाड, विजय वैद्य, रमेश पराते, विशाल नरवाडे,शिवा फाळके,रमेश चिंचोलकर, एजाज पटेल, व मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची उपस्थिती होती. तसेच यावेळी बिटरगाव (बू) पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार प्रताप भोस यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Women’s Day quotes) (Dhanki) (Shivjayanti 2023) ( Shiv Jayanti was celebrated with enthusiasm Dhanaki)