– विविध स्पर्धेचे केले आयोजन
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २१ : महाराष्ट्राचे आध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा २०२४ कुरखेडा शहरांमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम सोहळ्यामध्ये दोन दिवसीय कार्यक्रम घेण्यात आले. १८ तारखेला दुपारी चार वाजता पासून वेशभुषा स्पर्धा आयोजित केली होती तर सायंकाळी सात वाजता नृत्य स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शोएब शेख, राहुल दांडेकर, नितीश निरंकारी, यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याकरिता प्रमुख व्याख्यानकर्ते म्हणून कुरखेडा शहरातील महिला व बालविकास अधिकारी गणेश कुकडे तसेच विक्रांत ठाकरे, राजवर्धन कुकडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच रात्री नऊ वाजता श्याम म्युझिकल ग्रुप कुरखेडा तर्फे शिवभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
१९ ला सकाळी सात ते बारा वाजता पर्यंत शिवराय मनामनात शिवराय घराघरात या ओळीप्रमाणे ऑनलाईन रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी नऊ वाजता फवारा चौक कुरखेडा येथे पोलीस स्टेशन कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित एपीआय गावंडे, विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष वामनरावजी फाये, पत्रकार संघाचे नाशिर हाश्मी, महिला बाल विकास अधिकारी गणेश कुकडे, राजवर्धन कुकडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच उपस्थित मान्यवरांचकडून शिवभक्तांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच दुपारी तीन वाजता शिवराज्याभिषेक सोहळा पाळणा व आरती शिवभक्त परिवाराकडून करण्यात आली आणि लगेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांना प्रोत्साहन पर बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रम संपल्यानंतर लगेच भव्य महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालक पंकज बोळने, अक्षय काळबांडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंडळाचे अनिकेत आकरे, मुकेश माकडे, ईश्वर ठाकरे, देवेंद्र फाये, दिपक धारगाये, चेतन मैंद, एजाज शेख, प्रांजल धाबेकर, सागर निरंकारी, गणेश चौधरी, साईनाथ कोंडावार, शंकर मिसार, विकी चौधरी, जया गजबे, देवांशू कांबळे, दीक्षित बेहर, पंकज राऊत, मोंटी चौधरी, निखिल जांभुळकर, प्रवीण चांदेवार, रितेश मनुजा, साहिल फुलबांधे, राहुल टेकाम, पंकज हरडे, गौरव उराडे व समस्त शिवभक्तांनी सहकार्य केले.