खळबळजनक : दारू सोडण्याची औषध खाणे बेतले जीवावर, दोघांचा झाला मृत्यू

2187

– दोघांची प्रकृती चिंताजनक
The गडविश्व
चंद्रपूर, दि. २२ : दारूचे व्यसन असलेल्या चौघांनी दारू सोडण्याचे औषध तर खाल्ले मात्र ते औषध खाणे चौघांच्या जीवावर बेतले असून यात दोघांचा मृत्यू तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची खळबळजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील गुडगाव येथे २२ मे रोजी सकाळी उघडकीस आली. सदर घटनेने खळबळ उडाली असून मृतकांमध्ये सहयोग सदाशिव जिवतोडे (१९), प्रतीक घनश्याम दडमल (२६) रा. गुडगाव यांचा समवेश आहे तर सदाशिव पुंजाराम जिवतोडे (४५) व सोमेश्वर उद्धव वाकडे (३५) यांची प्रकृती चिंताजनक आहे.
गुडगाव येथील चौघेजण हे दरूने व्यसनाधीन झाल्याने जाम जवळील शेडगाव जि. वर्धा येथे शेळके महाराजांकडे दारू सोडण्यासाठी २१ मे रोजी गेले होते. दरम्यान महाराजांनी दारू सोडण्याची त्यांना औषध दिली. तिथून स्वगावी गुडगाव सायंकाळी परत आल्यानंतर या चौघांचीही प्रकृती बिघडल्याने लगेच त्यांना भद्रावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सहयोग जिवतोडे व प्रतीक दडमल या दोघांचा रात्री मृत्यू झाला, तर सदाशिव जिवतोडे व सोमेश्वर वाकडे या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
दरम्यान या घटनेची माहिती भद्रावतीचे पोलिसांना माहिती होताच दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात येथे आणण्यात आले. तर ज्या औषधीमुळे दोघांचा जीव गेला याचा तपास करून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितल्याचे समजते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साठम यांनी भेट देऊन माहिती घेतली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
(#thegadvishva #thegdv #chandrpuenews #alcohal #bhadravati)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here