– प्रीती पिल्लारे व जागृती उराडे यांनी घातली गवसणी
The गडविश्व
ब्रम्हपुरी, दि. ०६ : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी नगरपरिषद लद्वारे महिला व बालकल्याण विभागांतर्गत महिला सक्षमीकरण या उपक्रमांतर्गत महिला व मुलींकरिता सहा महिन्यांचे मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणातील दोन विद्यार्थिनींची पोलीस शिपाई पदी निवड झाली आहे.
सदर मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाकरिता एकूण ४४ विद्यार्थिनीची निवड करण्यात आलेली आहे. या प्रशिक्षणातील प्रीती पिल्लारे व जागृती उराडे या विद्यार्थिनीची बुलढाणा पोलीस शिपाई व नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई पदी झाली आहे. महिला व बालविकास विभागांतर्गत महिला व मुलींकरिता मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण राबविण्याची संकल्पना ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अर्शिया जुही यांनी मांडली. या संकल्पनेतून अनेक गरीब व होतकरू विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षेची तयारी करणे सोपे झाले आहे. या उपक्रमांतर्गत ४४ विद्यार्थिनी मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेत आहेत. निवड झालेल्या विद्यार्थिनींनी आपल्या यशाचे श्रेय मुख्याधिकारी अर्शिया जुही (ब्रह्मपुरी नगरपरिषद) तसेच विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणारे लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी गडचिरोलीचे संचालक प्राध्यापक राजीव सर, सहाय्यक शिक्षक प्रवीण सर, व शारीरिक चाचणी घेणारे प्रफुल सर यांना दिले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #laksyvedh)