– विदर्भातील सर्व प्रश्नांवर विषयावर होणार चर्चा
The गडविश्व
गडचिरोली,०५ : विदर्भ राज्य आंदोलन समितीचा नागपुर येथील मुख्यालयात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. बामनराव चटप यांचा अध्यक्षतेखाली १७ जानेवारी रोजी पार पडलेल्या बैठकीत २३ व २४ मार्च २०२५ रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दुसरे अधिवेशन नागपूरात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरम्यान या अधिवेशनात विदर्भातील सर्व प्रश्नांवर विषयावर होणार चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला, विदर्भ राज्य आंदोलन समिती पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, मुकेश मसुरकर, अध्यक्ष युवा आघाडी विदर्भ प्रदेश, प्रशांत नखाते, अध्यक्षय नागपूर जिल्हा, अरुण मुनघाटे पाटील को.क.स, राजेंद्रसिंग ठाकूर, राजकुमार शेंडे, अशोक पोरेड्डीवार, धीसु खुणे, नासिर जुम्मन शेख, आर्शी शेख, मोतीराम लाटेलवार, मुत्ताजी दुर्गे, रामचंद्र कोडापे, वेणुगोपाल वाघधरे उपस्थित होते.
पुढे बोलताना सांगितले कि, २३ मार्च ला सकाळी १० वाजतापासून ते २४ मार्च दुपारी १ वाजतपर्यंत प्रतिनिधी अधिवेशन होणार आहे. २४ मार्च रोजी १ वाजता नंतर खुले अधिवेशन होणार असून या मध्ये १२० तालुक्यांचे प्रतिनिधी व पदाधिकारी हजर राहणार आहेत. तसेच या अधिवेशनात विदर्भातील सर्व प्रश्नांवर विषयाबार चर्चा होणार असून, विदर्भातील अनुशेषावरही चर्चा होणार आहे. तसेच राज्याची आर्थीक स्थिती दिवाळखोरीची असल्यामुळे शेतकरी आत्महत्या, सामाजिक आर्थीक प्रश्न असणारा बेरोजगारीमुळे फोफावलेला नक्षलवाद, कुपोषणाचा प्रश्न, अद्यावत मशनरी आर्थिक ताकत नसल्याने प्रदुषण नियंत्रीत करणारी आधुनिक मशीनरी सरकार लावू शकत नाही. शिवाय नैसर्गिक संसाधने व मोठ्या प्रमाणात जंगल असूनही, विदर्भात अतिरिक्त वीज असूनही, बारामाही नद्या असूनही सरकारची गुतंवणुकाची आर्थीक क्षमता समल्यामुळे येथे कारखानदारी उभी होवू शकत नाही, त्यामुळे युवकांसमोर उभा असलेला बेरोजगारीचा प्रश्न सुटूच शकत नाही. त्यामुळे या प्रश्नाचे एकच उत्तर म्हणजे विदर्भाचे स्वतंत्र राज्य होणे हेच आहे. विदर्भाविषयी सर्व पार्श्वभुमी, सर्व तज्ञ
या अधिवेशनात मार्गदर्शक मांडणार आहेत. तसेच विदर्भाचे राज्य सक्षम व शिलकीचे होणार आहे हि सत्य स्थिती डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रसिध्द अर्थतज्ञ विदर्भाचा अर्थसंकल्प सादर करुन जनते समोर मांडणार आहे. विदर्भाचा जनतेने २३ व २४ मार्च रोजी नागपूरात होणाऱ्या अधिवेशनात हजारोच्या संखेने सामील व्हावे असे आव्हान विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले आहे. ‘याची देही, याची डोळा’ विदर्भाचे राज्य मिळवू अशी संकल्पना करुन अधिवेशानात पुढच्या आंदोलनाची हुंकार भरली जाणार आहे असेही पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले.
