The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा (चेतन गहाने), दि. २६ : झाडीपट्टी नाटकांचा हंगाम सुरू झाला आहे. अशातच सध्या तरुणांना झाडीपट्टी नाटकांचा विसर होते अश्लीलते कडे घेऊन जात असलेल्या ‘हंगामातील धिंगाना’ ची ओढ लागली असल्याने ‘हंगामातील धिंगाणा’ झाडीपट्टी नाटकाला लागलेली कीड आहे असे प्रतिपादन पद्यश्री डॉ. परशुराम खुणे यांनी कुंभिटोला येथे एका नाटकाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
झाडीपट्टीतील कला टिकवून ठेवण्यासाठी कलावंत जीवाचे रान करीत आहे. अनेक ठिकाणी नाटकांचे आयोजन केले जाते मात्र आजची तरुणाई अश्लीलटेकडे वळत चालली असून झाडीपट्टी नाटकांकडे पाठ फिरवत डान्स हंगामाकडे आकर्षित होत चालली आहे जी घातक आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या पारंपरिक झाडीपट्टी रंगभूमी टिकविण्यासाठी आजच्या पिढीने प्रयत्न केले पाहिजे तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्र क्षेत्रातील पत्रकारांनी लेखणीच्या माध्यमातून हंगामाना लगाम घालण्यासाठी प्रशासनाला जाब विचारण्याचे आवाहन पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांनी यावेळी केले.
नाटकाच्या उदघाटन प्रसंगी पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना त्यांनी मार्गदर्शन केले तसेच पोलीस विभाग व इतर विभागाची परवानगी न घेता हंगाम कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन पत्रकारांनी त्यांना दिले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चांगेदेव फाये, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रवींद्र गोटेफोडे, डॉ.जगदीश बोरकर, ॲड. उमेश वालदे, ,निखिल चरडे, शहर अध्यक्ष सागर निरंकारी, सभापती अतुल झोडे, कृउबास संचालक मोनेश मेश्राम, तुषार कुथे, विवेक जनबंधु, विठ्ठल खानोरकर, विश्वंभर गहाणे,सोनाबाई मडावी, उपसरपंचा लता सहारे आदी उपस्थित होते.