३१ मे जागतिक तंबाखूविरोधी दिनी “ख-र्याला नाही म्हणा”

550

– मुक्तीपथ द्वारा आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, ३० मे : जागतिक तंबाखुविरोधी दिवसाच्या निमित्ताने ख-र्याला नाही म्हणा, खर्रा व तंबाखू मुक्तीची शपथ घ्या, असे आवाहन मुक्तीपथ अभियाना द्वारा करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील पुरुषांसोबतच महिला व मुलांमध्येही खर्रा खाण्याचे प्रमाण जास्त आहे. तंबाखु सेवनाला लोकांनी नकार द्यावा, यासाठी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे ३१ मे जागतिक तंबाखु विरोधी दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. या दिवशी तसेच यापुढे नियमितपणे जिल्हा स्तरीय तंबाखु नियंत्रण पथक सक्रीय राहील. कायद्याचे उल्लंघन करीत तंबाखु विक्री करताना आढळल्यास सदर व्यक्तीवर, किराणा, पानठेला, होलसेल किंवा किरकोळ विक्रेता असल्यास पथकाद्वारे कायदेशीर तपासणी करून कारवाई केली जाईल.
खर्रा हा तंबाखूजन्य पदार्थ आहे. सुगंधित तंबाखूचा वापर करून खर्रा तयार केला जातो. सुगंधित तंबाखू बंदी कायदा २०१२ नुसार खर्रावर संपूर्ण महाराष्ट्रात बंदी आहे. तरीही राजरोसपणे सर्वत्र विक्री केल्या जाते. शहरासह, ग्रामीण भागात अनेकांना खर्रा सेवनाचे दुष्परिणाम बघायला मिळतात. कोणाचे तोंड नीट उघडत नाही, साधे दोन बोट तोंडात जात नाही, काहींना तर तोंडाचा कर्करोगचा झाला आहे. मोठ्यांचे पाहून लहान मुले सुद्धा याचे शिकार झाले आहे. त्यामुळे तंबाखु विरोधी दिवसाच्या निमित्ताने सर्व नागरिकांनी, शासकीय व खासगी कार्यालयांच्या व सर्व संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी खर्रा न खाण्याचा संकल्प घेऊन तंबाखूला नकार द्यावा, तसेच सर्व पालकांनी आपले बघून आपला पाल्य खर्रा खायला तर लागला नाही.. याची खात्री करावी व किमान आपल्या मुलाला/ मुलीला तरी खर्रा, तंबाखू पासून वाचवावे, असे आवाहन मुक्तीपथ व राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम गडचिरोली जिल्हा सेल द्वारे करण्यात आले आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli new , muktipath, kharra la nahi mhana)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here