– दुचाकी चोरीचा मोठा रॅकेट उघड होण्याची शक्यता
The गडविश्व
ता. प्र / सावली, १९ ऑगस्ट : पोलीस ठाणे सावली येथे १७ ऑगस्ट रोजी दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असून गुन्ह्याच्या तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी करण महेश चेरकुरवर (१९) रा इंदाळा, गडचिरोली याला ताब्यात घेऊन कसून चौकशी व विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान ८ दुचाकी जप्ती केल्या व पुन्हा दुचाकी मिळण्याची शक्यता असून दुचाकी चोरीचा मोठा रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गडचिरोली व सावली परिसरात गेल्या काही दिवसात दुचाकी चोरी गेल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. दरम्यान १७ ऑगस्स्ट रोजी पोलीस ठाणे सावली येथे दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपीस ताब्यात घेऊन कसून चौकशी/विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याचा गडचिरोली येथील विधिसंघर्शित साथीदार मिळून गडचिरोली व सावली परिसरात मोटरसायकल चोरी करत असल्याचेही सांगितले. सदर आरोपीकडून चोरी करून ज्यांना दुचाकी विकल्या त्याच्याकडून एकूण ०८ दुचाकी पोलिसांनी जप्त केले व पुन्हा काही दुचाकी मिळण्याची शक्यता असून दुचाकी चोरीचा मोठा रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार आशिष बोरकर यांच्य नेतृत्वात पोलीस हवालदार दिलीप मोहुर्ले, संजय शुक्ला, पोलिस नाईक मोहन दासरवर, धीरज पिदुरकर, विजय कोटणाके, चंद्रशेखर गंपलवार यांनी केली.