सावरगाव पोलिसांतर्फे महिला दिनानिमित्त साहित्य वाटप

138

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ११ मार्च : पोलिस मदत केंद्र सावरगाव येथे पोलिस अधिक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने परिसरातील १५० महिलांना गरजू साहित्याचे वाटप सावरगाव पोलिसांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन कुलभट्टी गावच्या सरपंचा ज्योती उसेंडी यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थानी सावरगाव ग्रामपंचायतच्या सरपंच मोनिका पुडो या होत्या.
प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक रमेश पाटील यांनी उपस्थित महिलांना गडचिरोली पोलिसांकडून महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व त्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तर पोलिस उपनिरीक्षक हनमंत नकाते यांनी मुलाप्रमाणे मुलींनाही समान वागणूक देवून जास्तीत जास्त शिक्षण शिकवून मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन उपस्थित पालकांना केले. दरम्यान हद्दीतील उपस्थित महिलांना गृहउपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वीेतेसाठी पोलिस उपनिरीक्षक विश्वंभर कराळे, पोलिस उपनिरीक्षक मनोज जासूद, पोलिस अंमलदार मुलेटी, कुनघाडकर, नैताम व औरंगाबाद एसआरपीएफ गट क्र.१४ चे सर्व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.

(The gadvishva) (The gdv) (Gadchiroli news updates)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here