आलापल्ली येथे संकल्प सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन

197

The गडविश्व
अहेरी, ०४ ऑक्टोबर : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अहेरी अंतर्गत आज ०४ ऑक्टोबर २०२३ ला आलापल्ली येथे आकांक्षीत तालुका कार्यक्रम अंतर्गत संकल्प सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षिका छाया गुप्ता, विशेष अतिथी बालविकास प्रकल्प अधिकारी हेमलता कन्नाके , पोषण पुनर्वसन केंद्राचे डॉ.उमाटे, अधिपरिचरिका प्रियंका जाक्केवार, आहार तज्ञ तनुजा गेडाम, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमच्या मनीषा कांचनवार, पालवी फाउंडेशन मूलचेरा समनव्यक मुकेश नागापुरे, तितली चे मुन रायपूरे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील श्रीरामवार, आलापली येथील १२ अंगणवाडी केंद्राच्या सेविका, मदतनिस, महिला बचत गट प्रतिनिधी शालिनी लोणारे, गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, पालक वर्ग यावेळी उपस्थित होते.
संकल्प सप्ताह च्या कार्यक्रमात बालकांची व गरोदर मातांची वजन उंची मोजून घेऊन नोंद करण्यात आली. यावेळी ओटी भरणे तसेच ६ महिने पूर्ण झालेल्या ६ बालकांचे अन्नप्राशन, संतुलित आहार बाबत माहिती तसेच परसबाग लागवड करून बागेतील आहार मुलांना शिजवून देण्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमच्या मनीषा कांचनवार यांनी किशोरी स्वास्थ्य याबाबत मार्गदर्शन केले.Quality Education Support Trust या संस्थे अंतर्गत पालवी प्रकल्पा कडून उपस्थिताना मुन रायपुरे, नरेंद्र बन्सोड यांनी यावेळी माहिती दिली. तसेच तितली ग्राउंड सपोर्ट टीमचे समनव्यक मुकेश नागापुरे यांनी आपल्या प्रकल्पाबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी कु.हरिदासी सिकदर, कनिष्ठ सहाय्यक सुरेश भांडेकर, विकास चुधरी, आलापल्ली येथील सर्व सेविका, मदतनिस यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन अंगणवाडी सेविका ज्योती कोमलवार यांनी केले तर आभार माया नौनुरवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here